भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी अतुल जगताप पाटील यांची निवड

Google search engine

 

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी अतुल जगताप पाटील यांची निवड करण्यात आली.निवडीचे पत्र माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे , तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नीलकंठ शेळके ,अशोक खेडकर , बापूसाहेब शेळके , काका धांडे ,संजय मोरे , निलेश अडसूळ, बाळासाहेब डोंबाळे, संदिप शेगडे, सूनील जगताप , बापू शेळके , काका धांडे,दादासाहेब सोनमाळी यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले.

दिलेल्या निवडपत्रात म्हटले आहे की , आपण पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी अथक परिश्रम कराल .

यावेळी बोलताना अतुल जगताप पाटील म्हणाले की, आ. प्रा. राम शिंदे साहेब , तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष कर्जत तालुका नीलकंठ शेळके आदींनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारीला युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाला मी योग्य न्याय देणार असून असून पक्ष संघटन , बळकटीकरण करण्यासाठी अथक परिश्रम करणार आहे.निवडीबद्दल अतुल जगताप पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.