बांगर्डे गावचे सुपुत्र व मनसेचे जिल्हा सचिव श्री.संजय शेळके लढवणार श्रीगोंदा विधानसभेची जागा 

Google search engine

 

श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे गावचे सुपुत्र व मनसेचे जिल्हा सचिव श्री.संजय शेळके हे तालुक्यातील राजकारणात गेली १७ ते १८ वर्षापासून सक्रिय झाले आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून समाजासाठी अतिशय तळमळीने काम करत असतात.

बांगर्डे गावचे ते उपसरपंच म्हणून काम करत असताना त्यांनी मांडवगणगटातील सात गावांची पाणी योजना जल जीवन प्राधिकरण च्या माध्यमातून जवळपास ५४ कोटीची योजना त्यांनी स्वतःची जमीन बक्षीस पत्र देऊन त्या जागेवर योजना राबवली असून ती योजना ६० टक्के पूर्णत्वाकडे गेली आहे. तसेच श्रीगोंदा ते घोगरगाव जोडणारा रस्ता म्हणजे खांडगाव – बांगर्डे रस्त्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून त्या रस्त्याचे काम मार्गी लावले आहेत.

 

शेळके काय म्हणाले

श्रीगोंदा तालुक्यातील अनेक प्रश्न वर्षानुवर्षे तसेच पडले असून निवडणुकीपुरते आश्वासन द्यायचे व पुढच्या पाच वर्षांनी तेच मुद्दे पुढे करायचे हे श्रीगोंदा तील पुढाऱ्यांचे ठरलेले मुद्दे आहेत. आता तालुक्यात विकास हवा असेल तर जनतेने बदल करणे गरजेचे आहे. तालुक्यात अनेक प्रश्न तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यावर कोणी बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांना दरवेळेस उन्हाळ्यात कुकडीच्या पाण्यासाठी त्रास होतो हाता- तोंडाशी आलेले पीक जळून गेल्यानंतर पाणी सुटते! आमच्या डोळ्या देखत आमच्या नजरेसमोर आमच्या हद्दीतून पाणी खाली जाते आणि आम्हाला सगळ्यात शेवट पाणी सुटते त्यावेळेस दुर्दैवाने लाईटचा प्रॉब्लेम होतो आणि जीवापाड जपलेलं पीक पाण्याकडे पाहून करपून जाते हेच तालुक्यातील वास्तव आहे हे नाकारता येणार नाही. 

 

रस्त्यांची कामे व विकास कामे हे काय फक्त तालुक्यातील ठेकेदारांसाठी आहेत की काय एवढी निकृष्ट दर्जाची कामे तालुक्यात होत आहेत, जनतेच्या पैशाचा वापर फक्त विकास कामांऐवजी टक्केवारीसाठी जास्त होत आहे याला जबाबदार आपण आहोत हे विसरता येणार नाही. होय हे बदलण्यासाठी आता बदल घडवणे गरजेचे आहे. काम करण्यासाठी जनतेने मला एक संधी दिली तर मी येणारी पाच वर्षे फक्त आपली सेवा करण्यासाठी आमदार म्हणून नव्हे तर आपला सेवक म्हणून काम करेल असेही शेळके यांनी यावेळी बोलताना सांगितले.