

रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास कल्याण मंडळ या विभागांच्या संयुक्त विद्यमाने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहरातील ‘स्नेहप्रेम’ या अनाथ संस्थेतील ३५ मुलांना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
याप्रसंगी सायन्स विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दत्ता शेंडे यांच्यावतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘स्नेहप्रेम’ संस्थेचे संचालक फारुख बेग सर यांनी सहकार्य केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक, विद्यार्थी विकास कल्याण मंडळाचे प्रा. सागर शिंदे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते







