
कर्जत तालुक्यातील अवघ्या २८ पटसंख्या असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावणे वस्ती येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन अतिशय दिमाखात साजरा करण्यात आला पावणेवस्ती ही एक छोटीशी वस्ती असून या ठिकाणी शाळेचा पट फक्त २८ आहे परंतु स्वातंत्र्य दिना दिवशी शाळेतील शिक्षकांनी शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट भाषणे ,सांस्कृतिक कार्यक्रम व लेझीम बसवल्यामुळे अतिशय बहरदार असा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ,माजी सरपंच ,सदस्य, पदाधिकारी ,प्रगतशील शेतकरी युवा तरुण वर्ग व महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला ज्ञानबा तुकाराम या गीतावर इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पखवाज वादन केले व त्यावरील बाकीच्या मुलांनी लेझीमच्या ठेक्यात अतिशय सुंदर स्वरूपात ही सादर केले सदर कार्यक्रमाची यशस्वीता पाहता गावातील लोकांनी भरभरून सहकार्य केले यावेळी ग्रामपंचायतीने शाळेला २८ हजार रुपये किमतीचा संगणक संच दिला तसेच खाऊ , शालेय साहित्याच्या स्वरूपामध्ये तसेच भौतिक सुविधांसाठी एकूण शाळेला गावकऱ्यांनी ५८ हजार ५६२ रुपयाचा घवघवीत असा लोकसहभाग दिला त्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक गौतम मांडगे सर यांनी केले तर शाळेच्या वतीने प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र रणसिंग सर यांनी केले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अजिनाथ शिवाजी पावणे व इतर सदस्यांचे सहकार्य लाभले, केंद्रप्रमुख श्री राऊत साहेब यांचे मार्गदर्शन केले ,तसेच विस्तार अधिकारी श्री धादवड साहेब व गटशिक्षणाधिकारी श्री प्रदीप शिंदे साहेब यांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक केले. मुलांना खाऊ वाटप करून तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






