स्वातंत्र्य दिनानिमित्त सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे विविध प्रकल्पाचे उद्घाटन

Google search engine

 

सद्गुरु कृषी महाविद्यालय चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी कार्यानुभव शिक्षणासाठी विविध प्रकल्पाची निर्मिती केलेली असून स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे, अध्यक्षा सौ. कल्याणी ताई नेवसे, सचिव ह.भ. प. श्री. राजेंद्रजी गोरे, संचालक कु.प्रतीक्षा नेवसे. ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी वन संरक्षक माननीय गुरुनाथ अनारसे, बेलगाव चे सरपंच सदा बापू शिंदे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.सखाराम राजळे सद्गुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे इतर घटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या उपस्थित स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या शुभहस्ते या विविध प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले

या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी अन्नप्रक्रिया दुग्ध प्रक्रिया आणि फळ प्रक्रिया युक्त विविध पदार्थ बनवून ते सर्वांना उपलब्ध करून दिले होते त्यांच्या विक्रीची व्यवस्था विद्यार्थी स्वतः करतात आणि या प्रक्रिये तून होणाऱ्या नफ्यातून अर्धा नफा हा विद्यार्थ्यांमध्ये वाटला जातो कृषी शिक्षणाचा एक भाग म्हणून हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले संस्थेचे संस्थापक डॉ. नेवसे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जनाबरोबरच अर्थाजन करावे असे त्यांनी आवाहन केले. अध्यक्षा सौ. कल्याणी ताई नेवसे यांनीही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रक्रियायुक्त पदार्थ बनवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गुरुनाथ अनारसे यांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना विक्री आणि प्रसिद्धी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव राजेंद्रजी गोरे यांनीही विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे यांनी विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिकत उत्तरोत्तर उत्कृष्ट व्यावसायिक किंवा उद्योजक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आणि सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे यांनी उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना या प्रकल्पाविषयी माहिती सांगितली आणि भविष्यात असे अनेक प्रकल्प सुरू करणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी म्हणून अन्नतंत्र विभाग, दुघशस्त्र विभाग आणि उद्यानविद्या अंतर्गत काढणीपश्चात तंत्रज्ञान विभाग यांच्या प्राध्यापकांनी विशेष मार्गदर्शन केले .

या उपक्रमांतर्गत महाविद्यालयामध्ये रोपवाटिका प्रकल्प गांडूळ खत प्रकल्प भाजीपाला उत्पादन प्रकल्प फळ उत्पादन प्रकल्प सेंद्रिय निविष्ठा निर्मिती प्रकल्प कुक्कुटपालन प्रकल्प असे विविध प्रकल्प सुरू असून विद्यार्थ्यांना व्यवसायिक होण्याचे धडे या निमित्ताने मिळत आहेत.