पुढील दोन महिन्यांत आघाडीचे सरकार सत्तेवर येणार ; आमदार रोहित पवार हे मंत्री – खासदार निलेश लंके

Google search engine

 

 

सगळ्यांचा नाद करायचा पण पवारांचा नाही, पुढील दोन महिन्यांत आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. आमदार रोहित पवार हे मंत्री असणार आहेत.असे मत जामखेड येथे विविध विकास कामांचा लोकार्पण व शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रसंगी बोलत होते.

यावेळी महाविकास आघाडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व अहिल्यानगर दक्षिण चे खासदार निलेश लंके यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार रोहित पवार, प्रताप ढाकणे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी सभापती सुधीर राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, सुरेश भोसले, दत्तात्रय वारे, राजेंद्र पवार सर,संजय वराट,सुर्यकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य

शहाजी राळेभात,तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट,माजी सभापती राजश्रीताई मोरे, सरपंच अंजलीताई ढेपे,वैशालीताई शिंदे, शेतकरी नेते मंगेश आजबे,नरेंद्र जाधव,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात,प्रकाश काळे, प्राचार्य विकी घायतडक,भारत काकडे,नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण,शरद शिंदे, हनुमंत पाटील,महेंद्र राळेभात,अभय शिंगवी,प्रशांत राळेभात,कुंडल राळेभात,समिर चंदन, रमेश आजबे,प्रविण उगले, ॲड. हर्षल डोके,अनिल बाबर,गणेश हगवणे, सचिन शिंदे, वसिम सय्यद, सरपंच सागर कोल्हे, बाळासाहेब खैरे,प्रदीप शेटे, हरिभाऊ

बेलेकर,बापूसाहेब कार्ले, गणेश चव्हाण,काकासाहेब कोल्हे, सुरेश पवार, राहुल बेदमुथ्था, मंगेश बेदमुथ्था,अरुण गाडेकर, रामहरी गोपाळघरे,महेश राळेभात, अमोल लोहकरे,संदीप गायकवाड, प्रकाश सुपेकर,अक्षय खिळे, सचिन डोंगरे, अशोक पठाडे,बिलाल शेख, प्रशांत वारे, युवराज उगले,विजय खाडे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी ” लाडकी बहीण योजना आणली आहे.भारतीय जनता पक्षाचे दाखवायचे दात वेगळे आहे.दडपशाही केलेले राजकारण टिकत नाही.हे जनतेने लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे.सोयाबीन, उसाच्या जेवढ्या जाती आहेत.तेवढे पक्ष तयार झाले आहेत.

आमदार रोहित पवार म्हणाले की, एमआयडीसी चे क्रेडिट मला मिळू नये म्हणून विरोधकांनी खोडा घातला आहे.मतदार संघात विकासाचे काम करताना कोणताही जाती भेद केला नाही.राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास कामे केली आहेत.कोट्यावधी रुपये मंजूर करुन आणलेल्या पंचायत समिती,सार्वजनिक वाचनालय,नगर परिषद, नाना – नानी पार्क, स्मशानभूमी, सामाजिक सभागृह तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना १० हजार सायकल चे वाटप करण्यात आले.अजून ४ हजार विद्यार्थ्यांना सायकल चे वाटप करण्यात येईल .