शंभू मसाल्यांचा ११ ऑगस्ट रोजी उद्घाटन सोहळा

Google search engine

 

कर्जत मध्ये शंभू मसाल्यांचा , रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी तनपुरे फार्म , पळसवाडा रोड , कर्जत येथे उद्घाटन सोहळा रवींद्र पवार साहेब , उपजिल्हाधिकारी , खासगी सचिव , अन्न व औषध प्रशासन, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त तनपुरे पाटील परिवार व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.

दैंनदिन जीवनात घरगुती मसाले हे आवश्यक आहेत. सर्व प्रकारचे घरगुती मसाले हे आपल्या कर्जत मध्येच मिळणार असून शंभू मसाले या ब्रँड द्वारे ते अल्पावधीत कर्जत करांच्या पसंदिस उतरतील अशी खात्री तनपुरे पाटील परिवार यांनी यावेळी व्यक्त केली . खमंग , रुचकर, चविष्ट भाजी बनवण्यासाठी मसाले हे महत्वाचे आहेत ही बाब ओळखून तनपुरे कुटुंबीयांनी शंभू ऑईल , शंभू डाळी नंतर शंभू घरगुती मसाले ब्रँड आणला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सुनंदा ताई पवार , राणीताई लंके , धनश्री ताई विखे पाटील , आशाताई शिंदे , लता खटावकर , कोल्हापूर , सागर बालटे , पुणे ,सुनिल बाप्पा मोरे , अध्यक्ष शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र ,प्रवीण दादा घूले, नामदेव देवा राऊत , बाळासाहेब दादा साळुंखे, कैलास धुत , पुणे , नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष , अध्यक्ष कर्जत व्यापारी असोसियशन , अध्यक्ष व सर्व डॉ.कर्जत तालुका , अध्यक्ष व सर्व कर्जत तालुका केमिस्ट असो.कर्जत , सर्व सामाजिक संघटना , तालुका कृषी अधिकारी, व सर्व कृषी कर्मचारी ,अध्यक्ष व सर्व पत्रकार , सर्व हॉटेल व्यावसायिक व आचारी बांधव उपस्थित राहणार आहेत.