बेंदवस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीहरीविजय ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजन

Google search engine

 

श्री.गजानन , श्री राम प्रभू , हनुमंतराव , आत्मारामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व समस्थ ग्रामस्थ बेंदवस्ती यांच्या सहकार्याने बेंदवस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीहरीविजय ग्रंथराज पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .या सोहळ्यानिमित्ताने मंगळवार १३ ऑगस्ट रोजी ह.भ.प.दिलीप महाराज मुळे , मुळेवाडी यांचे हरिकीर्तन होणार आहे.बुधवार १४ ऑगस्ट रोजी ह. भ. प. दिपालीताई खिळे, कानडी यांचे हरीकीर्तन होणार आहे.गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी ह. भ. प.कैलास महाराज ननवरे यांचे हरिकीर्तन पार पडणार आहे.शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी ह. भ. प. विजय महाराज नेहेरे यांचे हरीकिर्तन पार पडणार आहे. शनिवार १७ ऑगस्ट रोजी ह. भ. प.गणेश महाराज देवडे यांचे हरिकीर्तन पार पडणार आहे.रविवार १८ ऑगस्ट रोजी ह. भ. प.बाळकृष्ण महाराज दळवी यांचे हरिकिर्तन पार पडणार आहे.सोमवार १९ ऑगस्ट रोजी ह. भ. प.कृष्ण महाराज जोपळे यांचे हरीकीर्तन पार पडणार आहे.मंगळवार २० ऑगस्ट रोजी ह. भ. प.कृष्ण महाराज जोपळे यांचे हरिकिर्तन पार पडणार असून त्यानंतर भाविकांना महाप्रसादाच्या पंगतीचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथवाचक म्हणून ह . भ.प.आजिनाथ महाराज मुळे , मृदुंगाचार्य ह.भ.प.केशव महाराज शिंगाडे , ह.भ.प.चैतन्य महाराज ह.भ.प.विकास महाराज मुळे, हार्मोनियम ह.भ.प. बबन साहेब मुळे, ह.भ.प.आजीनाथ नवले, ह . भ.प.विश्वनाथ महाराज मुळे ,  गायक ह.भ.प.बाळू महाराज शेळके ,

ह. भ. प.भैरू अण्णा शेळके , ह.भ.प.परसराम महाराज मुळे , ह.भ.प.महाराज शिंगाडे, ह.भ.प.शरद महाराज शिंगाडे आदींची साथ लाभणार आहे.समस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ , भजनी मंडळ यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.