आ. राम शिंदे हेच खरे विकास पुरुष : पै.दत्ता भाऊ शिंदे

Google search engine

 

कर्जत जामखेड मधील जनता सुज्ञ असून त्यांना माहीती आहे की प्रा.राम शिंदे साहेब यांनी सहकारी साखर कारखाना काढला नसेल पण त्यांनी जे जनतेला काय हवं आहे हे माहीत आहे. मतदार संघातील कष्टकरी शेतकरी जनतेसाठी झटणारा नेता कोण हे सर्वश्रुत असून कर्जत जामखेड तालुक्याचे भाग्य उजळले ते शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आमदार झाल्या पासून . आ.राम शिंदे पालकमंत्री झाल्यापासून ज्या गावात देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत डांबरी रस्ता नव्हता त्या प्रत्येक खेड्यावस्ती पर्यंत गावापर्यंत दळणवळण करण्यासाठी रस्ते तयार केले. कर्जत शहराची पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती होती हा प्रश्न कोणी सोडवला , शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याची काय परिस्थिती होते हे सर्वांना माहीत आहे. तालुक्यातील व राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कृषी विद्यापीठ , स्वतःच्या मालकीचे कृषी विद्यापीठ आ .शिंदे साहेबांना करता आले असते पण शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या मुलांचं हीत कुणी पाहिले , प्रा राम शिंदे साहेब हे व्यापारी नेता नाही की आपल्या दोन नंबरच्या आर्थिक कारणांमुळे पक्षांतर करणार ते शिंदे साहेब नाहीत , व्यावसायिक नेत्याला शिंदे साहेब काय कळणार अशी प्रतिक्रिया यावेळी पै .दत्ता भाऊ शिंदे यांनी दिली.