
स्वच्छ सुंदर हरित दुरगाव , तालुका कर्जत येथे घनकचरा अधिनियम २०२६ अंतर्गत कचरा व्यवस्थापन शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याबाबत प्रथमच विशेष कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दुर्गाव येथे सकाळी ९ वाजता करण्यात आले. या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका,आणि विविध विभागांच्या प्रतिनिधींमध्ये घनकचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यात आली.या कार्यक्रमासाठी मा. राजेंद्र देसले साहेब श, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग अहिल्यानगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या.ठुबे मॅडम जिल्हा समन्वयक स्वच्छ भारत अभियान,डॉ. राजेंद्र सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी, मा.परमेश्वर सुद्रिक, विस्तार अधिकारी; मा. कराळे साहेब, विस्तार अधिकारी; मा. गायकवाड मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी; ठुबे मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश सुपेकर, मुख्याध्यापक; बजरंग गोडसे सर व प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकवृंद; काशिनाथ जायभाय माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निकत सर व त्यांचे सर्व सहकारी; जनक वाघमारे, स्वच्छता कक्ष, कर्जत आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नवनाथ गायकवाड,मा.अशोक जायभाय, सरपंच आजिनाथ जायभाय, उपसरपंच पप्पू शेख, बाळासाहेब भगत, चेअरमन गणेश निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश वाबळे, सुभाष धांडे, सोमनाथ शिंदे, शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष जायभाय, बाळासाहेब बिनवडे, भरत कुलथे, सागर डाळिंबे, शाहजी जायभाय, आप्पा निंबाळकर, माजी वसुंधरा टीमचे सदस्य, आरोग्य सेवक शुभम बर्डे, आरोग्य सेविका सोजर मिसाळ, सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनजागृती फेरीतून स्वच्छतेचा संदेश
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीच्या माध्यमातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि गाव स्वच्छ ठेवणे याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व उपयुक्त वस्तू तयार करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी विशेष कौतुक केले. तसेच रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि इतर सहभागी घटकांचाही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बजरंग गोडसे सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कराळे साहेब यांनी स्वीकारले. जनक वाघमारे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडली, तर अशोक जायभाय यांनी गावामध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा सादर केला.
डॉ. राजेंद्र सांगळे, परमेश्वर सुद्रिक साहेब, गायकवाड मॅडम, गावडे सर आणि अन्य मान्यवरांनी घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि लोकसहभागाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी दुर्गाव ग्रामस्थांचे विशेष कौतुक करत गावाच्या विकासाला जिल्हा परिषदेचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. दुर्गाव गाव भविष्यात जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर निश्चितच नावारूपाला येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गावाचा संपूर्ण आराखडा समजून घेतला असून, गावाच्या विकासासाठी आणि योग्य न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यशाळेमुळे गावामध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शास्त्रशुद्ध घनकचरा व्यवस्थापनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य विभाग, महिला कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी पप्पू शेख यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे आभार मानले. सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करून दुर्गाव गावाने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
स्वच्छ, सुंदर आणि हरित दुर्गावच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल गावाच्या विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.






