
दुरगाव येथील काशीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था च्या संचालकपदी श्री. रोहिदास देवराव जायभाय आणि सौ. विद्या किरण भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. संस्थेने “विश्वास आणि सुरक्षिततेचा” ब्रीदवाक्याने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील तरुण पुरुष महिलांना व्यवसायासाठी कर्जवाटप करून आर्थिक बळ दिले आहे.तसेच सभासद ठेवीदारासाठी संस्थेने 24 महिन्याच्या FD वर 11% आकर्षक व्याजदर दिला आहे.ग्रामीण भागातील लोकांनी जास्तीत जास्त FD मध्ये गुंतवणूक करून संस्थेच्या खूप साऱ्या सेवाचा लाभ घेण्याचे अहवान संस्थेच्या चेअरमन सौ. भगत यांनी केले आहे.नवीन संचालकांच्या निवडीबद्दल संस्थेच्या चेअरमन सौ.सोनाली जी.भगत व व्हा.चेअरमन सौ. मानसी एस.जायभाय आणि सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अधिक मेहनतीने काम करण्याचा विश्वास नव्याने निवड झालेले संचालक श्री रोहिदास जायभाय व सौ. विद्या भगत यांनी व्यक्त केला. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून माझी वसुंधरा अभियान दुरगाव यासाठी छोटीसी मदत म्हणून ₹ 2100/- दिले.
संस्थेच्या या कार्यक्रमाला मान्यवर,संस्थेचे चेअरमन सौ.सोनाली .जी.भगत व व्हा. चेअरमन सौ.मानसी एस.जायभाय व दुरगाव वि.वि.कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री गणेश निंबाळकर तसेच पतसंस्थेचे संचालक श्री. बाळासाहेब केकाण, श्री उमेश निंबाळकर, श्री.राजेंद्र वाबळे, श्री.दादा ठोंबरे, श्री.भरतरी शिंदे,श्री. सुरेश वाबळे, श्री. बाळासाहेब बिनवडे, श्री राजेंद्र बांगर, श्री.राजू केदार,श्री अमोलजी कुलथे तसेच दुरगावचे युवा नेते श्री उद्धवजी जायभाय आदी मान्यवर सभासद आणि खातेदार उपस्थित होते, कार्यक्रमाची सांगता संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गणेश पी.भगत यांनी केले






