
परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचा उत्तम संगम असलेले, स्वभावाने दिलदार, मनमिळाऊ असलेले दत्ता वाघ यांचा आज वाढदिवस. कृजर, स्विफ्ट व पीक अप गाडी व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी परिसरात विश्वासार्हता, वेळेचे काटेकोर पालन आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या कामातील शिस्त, व्यवहारातील स्पष्टता आणि प्रत्येक कामात दाखवलेली तत्परता यामुळे ते अल्पावधीतच परिचित व आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहेत.
दत्ता वाघ हे केवळ व्यवसायापुरते मर्यादित नसून सामाजिक उपक्रमांमध्येही नेहमीच पुढाकार घेतात.
त्यांचा सर्वत्र मोठा मित्र परिवार असून सुख दुःखाच्या, अडचणीच्या काळात सर्व ड्रायव्हर मित्रांना अडचणीच्या काळात ते तत्पर मदत करतात. स्थानिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कृजर, स्विफ्ट आणि पीकअप गाडी व्यवसायामुळे अनेकांना वेळेवर सेवा मिळत असून, ग्रामीण व शहरी भागातील दळणवळण सुलभ करण्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. पीकअप द्वारे मुंबई, पुणे येथे मालवाहतूक केली जाते.
वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला नवी ऊर्जा लाभो, व्यवसायात अधिक प्रगती होवो आणि आरोग्य, सुख-समृद्धी व यश त्यांच्या पाठीशी सदैव राहो, हीच सदिच्छा. कुटुंबीय, मित्रपरिवार, ग्राहक आणि हितचिंतकांच्या वतीने दत्ता वाघ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!






