
राक्षे घराण्याची उज्ज्वल परंपरा पुढे नेत, अवघ्या १३ व्या वर्षी क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन करत आयुष्यमती समृद्धी धनंजय राक्षे हिने संपूर्ण परिसराचा गौरव वाढवला आहे. ता. सांगोला, जि. सोलापूर येथे पार पडलेल्या ओपन जिल्हास्तरीय तायक्वादो स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक (Gold Medal) मिळवले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, डिकसळ गावाचे नाव महाराष्ट्रभर उजळले आहे.
समृद्धी ही दिव्या स्पोर्ट्स क्लब, पंढरपूर येथील गुणवंत विद्यार्थिनी आहे. लहान वयातच शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर तिने हे यश मिळवले. तायक्वादोसारख्या शारीरिक व मानसिक कसोटीच्या खेळात दाखवलेली तिची तयारी, आत्मविश्वास आणि कौशल्य हे तिच्या उज्ज्वल क्रीडा भवितव्याची साक्ष देतात.
समृद्धी ही आयु. धोंडिबा खंडू राक्षे सर यांची पुतणी असून, डिकसळ गावाचे युवा नेते व मा. ग्रामपंचायत सदस्य आयु. योगेश (भाऊ) राक्षे यांची लहान बहीण आहे. तसेच ती श्री संत तनपुरे बाबा चारोधाम मंडप ट्रस्टचे मातोश्री वृद्धाश्रम व्यवस्थापक व महाराष्ट्र राज्य पत्रकार मंडळाचा ‘किताब’ प्राप्त पत्रकार आयु. धनंजय खंडू राक्षे यांची कन्या आहे. कुटुंबातील सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी परंपरेचा वारसा जपत समृद्धीने क्रीडा क्षेत्रात नाव कमावले आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार व नातेवाईकांनी समृद्धीच्या पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही कामगिरी परिसरातील तरुण-तरुणींना प्रेरणादायी ठरत असून, भविष्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरही ती यशाचा झेंडा फडकावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
समृद्धीच्या पुढील उंच भरारीस हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक :निलेश राक्षे, समस्त राक्षे परिवार व नातेवाईक






