दादा पाटील महाविद्यालयात एमसीएस अभ्यासक्रम सुरू 

Google search engine

 

रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये २०२५-२६ या चालू शैक्षणिक वर्षांमध्ये एमसीएस अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली असून या वर्षापासून एमसीएसचे वर्ग सुरू होत आहेत. प्राचार्य डॉ. संजय नगरकर व महाविद्यालय विकास समितीच्या सहकार्याने आणि रयत शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यासक्रमास विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.

कर्जत तालुका परिसरात कोठेही एमसीएस अभ्यासक्रम उपलब्ध नाही. विद्यापीठाच्या निर्देशित फीमध्ये विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.

 

सदर कोर्सला प्रवेश घेण्याकरिता प्रा. गणेश बुरटे, संगणकशास्त्र विभागप्रमुख (९४०४३१७९२२) यांच्याशी संपर्क करावा.