
कर्जत तालुक्यातील 11 जून रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व वादळामुळे सुपे , बहिरोबावाडी रेहकुरी व चिंचोली काळदात परिसरात फळझाडे , सौर पॅनल व इतर मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने विद्युत खांब देखील कोसळले असून शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेवून उभारलेले सौर पॅनेल कोळसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . कर्जत तालुक्यात पाऊस नित्यनियमाचा झाला असून जून महिन्यातच अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचा मोठी आर्थिक हानी झाली आहे. या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.






