मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कापरेवाडी माहीजळगाव रोड या कामाचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब व प्रवीण दादा घुले पाटील यांच्या हस्ते आज पार पडणार  , मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे लोकनियुक्त सरपंच अनिल खराडे साहेब यांचे आवाहन 

Google search engine

 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बाजारखीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कापरेवाडी , माहीजळगाव रोड या कामाचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी आठ वाजता महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब व प्रवीण दादा घुले पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे अशी माहिती कापरेवाडी चे लोकनियुक्त सरपंच अनिल अशोक खराडे साहेब यांनी दिली.

कापरेवाडी ते माहीजळगाव रस्त्याचा प्रश्न दिवसेंदिवस प्रलंबित होता.विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांनी या रस्त्यासाठी १ कोटी २३ लक्ष रुपये मंजूर करत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. आज या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ आ. प्रा.राम शिंदे साहेब,प्रवीण दादा घुले पाटील, कापरेवाडी चे लोकनियुक्त सरपंच अनिल खराडे साहेब , सर्व ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी चेअरमन , व्हा.चेअरमन ,सर्व संचालक , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकनियुक्त सरपंच अनिल खराडे साहेब यांनी केले आहे .