चिलवडी व चिलवडी परीसरातील वाड्या वस्त्यांवरील सार्वजनिक पोलवरील स्ट्रीट लाईट साधारणपणे सहा महिन्यांपासून बंद आहेत. बऱ्याच वेळा मिटींग मध्ये चर्चा करुनही स्ट्रीट लाईट चालु केली जात नाही. त्यामध्ये रस्त्यांवर व वाड्या वस्त्यांवर रात्रीचे वेळी संपूर्ण अंधारमय होत आहे.
या स्ट्रीट लाईट शुक्रवार दि. २३ मे २०२५ रोजी पर्यंत चालु करण्यात याव्यात अन्यथा शुक्रवार दि. २३ मे २०२५ रोजी सकाळी ९:०० वा. आपल्या चिलवडी ग्रामपंचायत समोर भिक मागो आंदोलन केले जाणार आहे व जमा झालेली रक्कम ग्रामपंचायत प्रशासनाला सुपुर्द केली जाणार आहे. तरी तात्काळ स्ट्रीट लाईट चालु करण्याची विनंती अशोक लोंढे व सतीश फरांडे यांनी केली आहे. निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक , राशीन यांना पाठवण्यात आली आहे .






