
बुधवारी 14 मे 2025 रोजी पंचायत समिती कर्जत यांच्या दालनासमोर अळसुंदे गावातील पारसे वस्ती, गोरे वस्ती, लोंढे वस्ती तालुका कर्जत या ठिकाणी असणाऱ्या तीव्र पाणी टंचाई च्या विषयी पंचायत समिती कर्जत समोर पाण्याचा टँकर मागणी साठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने हलगी बजाव आंदोलन ठेवले होते या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकारी जगताप साहेब व आळसुंदे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सामसे साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन टँकर ची व्यवस्था करून दिली .
या आंदोलनाला वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे यांच्या नियोजनानुसार हे हलगी बजाव आंदोलन पार पडले.या हलकी बजाव आंदोलनाने आळसुंदे गावात तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत चालू झाला.
आंदोलन कर्ते जेष्ठ नेते उत्तम झेंडे पाटील, नंदकुमार गाडे सर, जिल्हा महासचिव संजय शेलार, जिल्हा महासचिव तुकाराम पवार, जिल्हा उपाध्यक्ष लखन पारसे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक ससाने, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, तालुका अध्यक्ष कर्जत दत्ता भालेराव, तालुका महासचिव मयूर ओहळ, तालुका महासचिव राजेंद्र गायकवाड,तालुका उपाध्यक्ष कैलास शेलार,मा. तालुका उपाध्यक्ष राहुल अडसूळ, तालुका शहराध्यक्ष विकास समुद्र,तालुका संघटक रवी सोनवणे, महिला तालुका अध्यक्ष रूपालीताई आढाव, बौद्धाचार्य गोधड (अण्णा) समुद्र, सोमनाथ गोरे, सोनू टकले, शिवा लोंढे, स्वप्निल (रॉकी) शेटे, सचिन माने, विजय पारसे, धनंजय शेलार, वैभव पारसे, मयूर पारसे, करण माने, इ. मान्यवर उपस्थित होते. वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रशासनाचे आभार मानले.






