श्री भैरवनाथ विद्यालयाची निकालाची परंपरा यंदाही कायम

Google search engine

 

श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी येथील श्री भैरवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तासिका, सराव चाचण्या, बोर्ड प्रश्नपत्रिका सराव, वैयक्तिक मार्गदर्शन, विविध उपक्रम ,वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, पालकांशी संवाद अशा विविध माध्यमातून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या संपूर्ण गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जातात तसेच यावर्षी दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक गोंटे अनुष्का गोरक्ष 91% द्वितीय क्रमांक गावडे शिवानी लक्ष्मण 87.80, गावडे वैष्णवी संतोष 83.60, इथापे हर्षदा बाप्पू 79.40, दरेकर रिया शहाजी 79.40 या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांनी यशस्वी झाले.

या विद्यार्थ्यांना भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पोपटराव परांडे, सौ पठारे मॅडम श्रीमती करंजुले मॅडम, थोरात सर क्षीरसागर मॅडम,काकडे मॅडम, बोरुडे सर, पाडळे सर या शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री विलासराव लांडे साहेब सेक्रेटरी श्री आत्माराम शिंदे साहेब, सरपंच काकासाहेब शिर्के शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल मुरकुटे उपाध्यक्ष गोरक्ष गोंटे ,सर्व संचालक , निंबवी, कोरेगव्हाण, कोंडेगव्हाण येथील ग्रामस्थ व विसापूर बिट विस्ताराधिकारी श्री भाऊसाहेब शिर्के या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच भावी वाटचालीसाठी सर्वांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या