न्यू इंग्लिश स्कूल माळंगीच्या दहावीच्या एस एस सी बोर्ड परीक्षा विद्यालयाचा निकाल 93.75 % लागला असून विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याची माहिती मुख्याध्यापक अभिमन्यू बेरगळ यांनी दिली.
यामध्ये प्रथम क्रमांक सार्थक दिलीप खामगळ 89.80% , द्वितीय क्रमांक ओमराजे गणेश जगताप 88.40% , तृतीय क्रमांक कु.समृद्धी सिताराम शेटे 82.60% , चतुर्थ क्रमांक ऋतुराज लक्ष्मण खामगळ 81.60% पाचवा क्रमांक कु.अनुराधा लक्ष्मण मासाळ 80.60% यांनी मिळवत उत्कृष्ठ यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, स्कूल कमिटी ,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक माळंगी डोंबाळवाडी निंबे, शेगूड मुख्याध्यापक ,शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.






