
मिरजगाव येथील अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या मिरजगाव शाखेला कर्जत जामखेड मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार रोहित दादा पवार यांनी काल सदिच्छा भेट दिली. या भेटीत धोंगडे उद्योग समुहाचे सर्वेसर्वा पतसंस्थेचे चेअरमन , उद्योजक पंकज धोंगडे यांच्या हस्ते आमदार रोहित दादा पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या दालनात आ. रोहित दादा पवार यांनी अरिहंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नेटबँकींग प्रणालीबाबत चौकशी करत चेअरमन पंकज धोंगडे यांच्याशी बँकीग क्षेत्राविषयी सविस्तर बातचीत केली. मिरजगाव सारख्या ग्रामीण भागात अरिहंत पतसंस्था नेटबँकींग उत्तमरित्या सेवा देत असल्याने संस्थेच्या
कामकाजाबाबत आ.रोहित दादा पवार यांनी कौतुक केले. तसेच चेअरमन पंकज धोंगडे यांनी उद्योग व बँकींग क्षेत्रात आपले अल्पवधीत नावलौकिक केल्याने त्यांना नुकताच मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल अभिनंदन करत धोंगडे यांचा आ. रोहित पवार यांनी सत्कार केला.
यावेळी कर्जत तालुका सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष डॉ. पंढरीनाथ गोरे, माजी उपसरपंच अमृत लिंगडे, डॉक्टर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोरडे, ईश्वर पवार, ग्रा.प.सदस्य सागर पवळ, धीरज धोंगडे, सलिम आतार, डॉ. सुभाष सुर्यवंशी, हारुण शेख, बबन दळवी, वसंत अनभुले, पै.अमोल माने, ढोले भाऊसाहेब, संस्थेचे संचालक सतिष धोंगडे, विकास पवळ, संतोष महामुनी, अंजली धोंगडे, रूपाली पंडित, मनिषा घोंगडे, प्रतिभा धोंगडे, राजेश मेहकर, अमोल सकट,जनरल मॅनेजर विजय वतारे, मैनेजर लतिफ तांबोळी, कॅशियर गणेश राऊत, क्लार्क प्रियंका नलावडे, बाबासाहेब नन्नवरे, गौरी भोकरे, सुरज पाचारणे, सोन्याबापू पेटकर, राणी चेडे, सुहास म्हेत्रे, अमोल कापरे, अजय शिंदे, अरविंद झांबरे, चंद्रकांत शेलार, सुधीर एखंडे, निखिल गदादे, अक्षय पाचारणे, गौरव साबळे, अनिता घोडके व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






