आळसुंदे येथे तीव्र पाणी टंचाई , ग्रामस्थांना स्वखर्चाने पाणी विकत घेण्याची वेळ  वंचित 13 मे रोजी हलगी वाजवून आंदोलन करणार ; लखन पारसे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अहिल्यानगर

Google search engine

आळसुंदे येथे तीव्र पाणी टंचाई , ग्रामस्थांना स्वखर्चाने पाणी विकत घेण्याची वेळ

वंचित 13 मे रोजी हलगी वाजवून आंदोलन करणार ; लखन पारसे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अहिल्यानगर

 

 

अळसुंदे ग्रामपंचायत गावठाण, टेम्बीवस्ती, गारमाळवस्ती, देमनवाडी आणि पारसे वस्ती येथे पाण्याची तीव्र टंचाई असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले असून ग्रामस्थांना स्वखर्चाने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर विकत घेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. ग्रामपंचायत आळसुंदे यांच्या कारभाराला ग्रामस्थ वैतागले असून कर्जत पंचायत समितीमध्ये मंगळवारी दिनांक 13 मे रोजी हलगी वाजून आंदोलन करण्यात येईल अशी माहिती लखन पारसे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अहिल्यानगर यांनी दिली .