राहुल घालमे यांची सहायक संचालक , महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा पदी निवड

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील शिंदे येथील राहुल सुनिल घालमे यांची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा – २०२३ मधून ‘ सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ‘ गट-अ पदी निवड झाली. काल या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राहूल घालमे यांचे दहावीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल शिंदे येथे झाले असून बारावीचे शिक्षण दादा पाटील महाविद्यालय , कर्जत येथे पूर्ण केले.तसेच ग्रॅज्युएशन दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथून त्यांनी पूर्ण केले. ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.या मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.