कोकणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. जयश्री निलेश सातपुते यांची बिनविरोध निवड 

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील कोकणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. जयश्री निलेश सातपुते यांची आज बिनविरोध निवड झाली.

कोकणगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदाकरीता आज निवडणूक प्रक्रिया मंडळाधिकारी बी. के. शेळके, ग्रामसेविका पी. जी. जोगदंड यांच्या उपस्थितीत पार पडली.

सरपंच पदाकरीता सौ. जयश्री निलेश सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.

माजी सरपंच महादेव गवारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.

यावेळी सभेला उपसरपंच संगिता संतराम सुर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य संभाजी रोहिदास बोरुडे, महादेव ज्ञानदेव गवारे, वैशाली अशोक गवारे, सौ. हिराबाई संभाजी काळंगे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी तीन सदस्य अनुपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच सौ. जयश्री निलेश सातपुते ह्या विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे कोकणगाव ग्रामपंचायत ही भाजपाकडे आली आहे.

सरपंच पदाच्या निवडीकरिता माजी सरपंच संभाजी बोरूडे, बिभीषण सुर्यवंशी,युवा नेते अशोक सातपुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सरपंच पदी सौ.जयश्री सातपुते यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच जयश्री सातपुते यांचा माजी सरपंच संभाजी बोरुडे यांच्यासह सदस्यांनी सत्कार केला. यावेळी युवा उद्योजक निलेश सातपुते, रमेश गवारे, अशोक गवारे, अशोक कुटे, रघुनाथ बोरुडे, विक्रम घोगरे, सुजित घोगरे, संजय सुर्यवंशी, तुषार सुर्यवंशी, शरद सातपुते, धनंजय सुर्यवंशी, संदीप सुर्यवंशी, भैरवनाथ सातपुते,प्रशांत सातपुते, हरिभाऊ काळंगे, लक्ष्मण कुटे, दत्तात्रय कुटे, बाळासाहेब सातपुते, योगेश सातपुते, डॉ. योगेश बोरूडे, डॉ. संतोष बोरुडे, गणेश सातपुते, शांतीलाल सुर्यवंशी, दत्तात्रय बोरुडे, वैभव सुर्यवंशी, सुनिल कुटे, बाळासाहेब बोरुडे, शहाजी गवारे, वैभव सातपुते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ.जयश्री निलेश सातपुते म्हणाल्या , विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करणार आहोत.

सरपंच निवडीबद्दल सौ.जयश्री सातपुते यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.