
टायगर करिअर अकॅडमी मिरजगाव ता.कर्जत मधील पोलीस व आर्मी भरती झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल उत्साहात संपन्न झाला .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिकेत भाऊ घुले , छत्रपती विचार व युवा सेना सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती लाभली. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.अतुल राजेजाधव , साईसृष्टी उद्योग समूह , मा. श्री.राहुल शेठ पवार , छत्रपती उद्योग समूह , मा.श्री .आनंद शेठ पाचपुते , आनंद उद्योग समूह , मा.श्री.राहुल दादा साबळे , संचालक टायगर करिअर अकॅडमी, आष्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
टायगर करिअर अकॅडमी हे पोलीस , आर्मी भरती साठी कर्जत , आष्टी व महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र बिंदू ठरला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे पोलीस,आर्मी व इतर भरती मध्ये भरती होण्याचे कित्येक जणांचे स्वप्न साकार करण्याचे काम टायगर करिअर अकॅडमी ने केले आहे असे अनिकेत भाऊ घुले यावेळी म्हणाले.






