सालाबाद प्रमाणे बाभूळगाव खालसा येथे श्री.भैरवनाथ यात्रा उत्सव उद्या सुरू होत असून तीन दिवशीय यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने गावातील सर्व युवकांनी एकत्र येत सुंदर कार्यक्रमांचे नियोजन केले आहे
उद्या संध्याकाळी रात्री दहा वाजता ज्योत प्रस्थान सोनारी ता.परांडा कडे होणार आहे. त्यानंतर शुक्रवार दिनांक 25 एप्रिल रोजी सकाळी 07.30 वाजता हलगी व रुद्रा 99 डीजे देव आगमन होणार आहे.सकाळी 08.30 वाजता कावड व ज्योत त्यानंतर 05.30 वाजता देवाची गाडी ओढणे व शेरणी वाटप , सायंकाळी 09.00 वाजता छबिना मिरवणूक , रात्री अकरा वाजता वामनराव पाटोळे यांचा तमाशा होणार आहे.त्यानंतर शनिवारी सकाळी 08.00 वाजता हजेरी तमाशा कार्यक्रम , दुपारी 03.00 वाजता हलगी कार्यक्रम , सायंकाळी 06.00 वाजता देवाची आरती , व संध्याकाळी तरुण वर्गाचे प्रमुख आकर्षण संध्या पाटील यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक भैरवनाथ यात्रा कमिटी , बाभूळगाव खालसा यांनी केले आहे.







