विठ्ठल रुक्मिणी मंदिर , टुले वस्ती नाथाचीवाडी येथे वारकरी वैष्णव मेळाव्याचे गुरुवर्य रघुनाथ दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त वारकरी वैष्णव मेळाव्याचे हे वर्ष 8 वे वर्ष होते. रुईगव्हान, नाथाचीवाडी हिरडगाव नजीक 14 नंबर चारी , विठ्ठल रुक्मिणी मंदिर , ता.कर्जत येथे आयोजन करण्यात आले होते. या बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी विठ्ठल रुक्मिणी प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन व पापमोचणी एकादशी दिनानिमित्त रात्री 07.30 ते 09.30 यावेळेत ह. भ. प.चैत्रालीताई घुले यांचे हरिकिर्तन संपन्न झाली. गुरुवार दिनांक 27 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 यावेळेत गुरुवर्य ह. भ. प.राजेंद्र नाना थोरात ,पिंपळसुटी यांचे हरिकिर्तन , दुपारी 01.00 ते 02.30 , व रात्री गुरुवर्य ह. भ. प.श्रीकांत महाराज पावणे यांचे 07.30 ते 09.30 यावेळेत हरीकिर्तन संपन्न झाले. शुक्रवार दिनांक 28 मार्च 2025 रोजी आनंद भूषण गुरुवर्य ह. भ. प.नवनाथ महाराज भोसले यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले . काल्याचे कीर्तन संपन्न झाल्यानंतर काला महाप्रसाद 12 ते 3 यावेळेत सर्व भाविकांना वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन चाककणकर मळा , टुले वस्ती , बाराभाई , भैरवनाथ तरुण मंडळ नाथाचीवाडी व सर्व ग्रामस्थांनी केले होते.गुरुवर्य राजेंद्रनाना थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.







