नागापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अंबादास सोपान जगताप यांची बिनविरोध निवड 

Google search engine

 

कर्जत तालुक्यातील राजकीय नागापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी काल अंबादास सोपान जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

नागापूर ग्रामपंचायत कार्यालयात आज ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंच सौ.अश्विनी नितीन निंबोरे यांनी अभ्यासी अधिकारी म्हणून काम पाहिले.ग्रामविकास अधिकारी धर्मराज गायकवाड यांनी सचिव म्हणून काम पाहिले.यावेळी सभेला सरपंच सौ.अश्विनी नितीन निंबोरे , अंबादास सोपान जगताप , चंदा सचिन निंबोरे , उज्वला नवनाथ निंबोरे , ललिता महेंद्र निंबोरे , सुशांत नामदेव निंबोरे , राहुल सुरेश निंबोरे उपस्थित होते.

उपसरपंच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अंबादास सोपान जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलालाची उधळण केली. यावेळी बोलताना उपसरपंच अंबादास सोपान जगताप म्हणाले , येणाऱ्या काळात सर्व ग्रामस्थांना बरोबर घेवून गावाचा सर्वसमावेशक विकास करणार आहे. उपसरपंच निवडीबद्दल  अंबादास सोपान जगताप यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.