
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत कोपर्डी ग्रामपंचायत अंतर्गत 64 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले . यावेळी सरपंच शांतीलाल सूद्रिक , उपसरपंच संतोष गांगर्डे , ग्रामपंचायत सदस्य सुनील सुद्रिक , दत्ता सूद्रीक , तात्या शिंदे , राहुल सुद्रिक , ग्रामसेवक अविनाश म्हेत्रे भाऊसाहेब , कर्मचारी , ग्रामस्थ , लाभार्थी उपस्थित होते .
महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत आज घरकुल लाभार्थ्यांनी राज्य शासनाने चालवलेल्या अभियानामध्ये भाग घेत घरकुल बांधकाम साहित्य, घरकुल बांधकाम या अनुषंगाने उपस्थित लाभार्थ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत बांधकाम पुर्ण केले तर उद्दिष्ट पुर्ती लवकर पुर्ण होईल व इतरही पात्र लाभार्थ्यांना या योजनेमध्ये भाग घेता येईल .यावेळी सर्व घरकुल लाभार्थ्यांनी उपस्थित राहत आपल्या स्वप्नातील घरासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या अभियान यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन कोपर्डी ग्रामपंचायत तर्फे करण्यात आले
महाआवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत कोपर्डी मधील 64 मंजुर लाभार्थ्यांना पत्र देण्यात आले. यावेळी काही लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर लाभार्थ्यांला बोलावुन त्यांचे यावेळी स्वागत करुन त्यांना पत्र वितरण करण्यात आले.यावेळी आज कोपर्डी ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम प्रगतीच्या टप्पानिहाय निधी वाटप प्रक्रिया बांधकाम साहित्याची उपलब्धता घरकुल बांधकाम आराखडा इत्यादी बाबत लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप झाले . काही लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण झाले.
थोड्याच दिवसामध्ये लाभार्थी निवड साठी शासन सर्वेक्षण करणार आहे. त्या संबंधिचे निकष थोड्याच दिवसामध्ये जाहीर करण्यात येणार आहेत असे यावेळी सांगण्यात आले.






