
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ.रोहित दादा पवार यांच्यासाठी सकारात्मक वातावरण होताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने आज दि. २४/१०/२०२४ कर्जत तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक तालुका प्रमुख मा. बळीराम अण्णा यादव यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटी परिसरात पार पडली. यावेळी कर्जत तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहिले. यावेळी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व तालुकाप्रमुख माननीय बळीराम अण्णा यादव यांचे नेतृत्वाखाली कर्जत तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण ताकतीने महाविकास आघाडीचे काम करणार असुन येथील महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित दादा पवार यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे एकमताने ठरविण्यात आले.






